जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 : ‘विकसित भारत @ 2047’ संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक उत्सव

पुणे, दि. १३ ऑक्टोबर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात येत आहे. ‘विकसित भारत @ 2047’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज, कॅम्प, पुणे येथे संपन्न होणार आहे.

या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, तसेच नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) यांसारख्या विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

स्पर्धकांसाठी १५ ते २९ वर्षे हा वयोगट निश्चित करण्यात आला असून, वयाची गणना १२ जानेवारी २०२६ या तारखेच्या आधारावर केली जाणार आहे. नावनोंदणीसाठी आधारकार्ड व जन्मदाखला अनिवार्य असून, शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

जिल्हास्तरीय विजेत्यांना प्राविण्य प्रमाणपत्र तसेच बक्षीस रक्कम प्रदान केली जाईल. याशिवाय प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी आपले प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून सादर करावेत:

  • ई-मेल: dsopune6@gmail.com
  • व्हॉट्सअ‍ॅप (संपर्क व्यक्ती):
    • अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी – 7387880427
    • ताहेर आसी – 9145402115
    • आशद शेख – 8484803529

तसेच, सर्व स्पर्धकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कला अकादमी आणि सांस्कृतिक संस्था येथील युवकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकशाही दिन — नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा दुवा!

Aatmanirbhar Bharat Gets a Boost as India Opens Missile and Ammunition Manufacturing to Private Sector

राज्यातील दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल! खासगी कार्यालयांतून मिळणार जलद सेवा, नागरिकांना भरावा लागणार अतिरिक्त ६ हजारांचा शुल्क